Posts

गाव म्हणजे काय ?

Image
गाव म्हणजे काळी माती निखळ नाती जेवणाच्या ताटाला हिरवी हिरवी पाती. मांजरापासून म्हशी पर्यंत सगळे प्राणी जेथे नुसते पाळले जात नाहीत तर ते तेथील घरचे सदस्य असतात अशा ठिकाणाला गाव म्हणतात.आता तुम्ही म्हणाल हि काय नवी व्याख्या ? पण काय करणार तुमची पुस्तके आमच्या गावांना फक्त काही विशिष्ट लोकसंखेच परिक्षेत्र म्हणून सोडून देतात.आता यात आमच्या म्हशी,गायी,शेळ्या,मांजरे,कुत्रे,वासरे, बैले हे कोण सांगणार म्हणून मी गाव म्हणजे काय हे जरा समजावून सांगतो.         गावची सकाळ :-             सकाळच्या कोवळ्या उन्हात आमच्या साखर झोपेचा चहा होणारच असतो  तेवढ्यात ,अरे ये कडू दुद्ग्या उठ की, कासराभर दिवस वर आला तरी उताणा पडलास, हा आमचा सकाळचा अलार्म ज्याला स्नूझ बटन नाहीच, हा नुसता वाजतच नाही तर कधी कधी वाजवतो सुद्धा हे दुसरे तिसरे कोणी नसून आमच्या मातोश्री. गावाच्या सगळ्याच मातोश्री आपल्या लेकराला  असे प्रेम रोजच देत असतात. अलार्मच्या भीतीने गडबडून उठणारे पाच वर्षापासून पंचवीस वर्षापर्यंतचे लाडके  डोळे चोळत लोटा पार्टीला निघून जातात.कोटा खाली झाला कि एक तांब्या डोक्यावर एक पाटीवर, एक देवाला, एक पोटाल